अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आदरणीय मा. मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन!
आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात ११-०२-२०२५ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला मा. मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
रक्तदान हे केवळ एक दान नव्हे, तर जीवनदान आहे. हे अत्यंत पुण्याचे आणि समाजोपयोगी कार्य असून, अशा उपक्रमांमुळे समाजात जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण होते. रक्ताचा प्रत्येक थेंब कोणाचे तरी जीवन वाचवण्यासाठी उपयोग होतो, ही जाणीवच आपल्याला या महान सेवेसाठी प्रेरित करते.
या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने समाजातील सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश अधोरेखित झाला. याप्रसंगी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्याधिकारी अनिल शिंदे आदींसह विविध विभागाचे प्राचार्य, विभाग प्रमुख व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.